भूपेश बघेल यांचा शपथविधी (Photo Credit: ANI)

Chhattisgarh CM's oath-taking: छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पाच राज्यातील विधानसभा  निवडणूकांच्या निकालांनी सत्ता परिवर्तन केले. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी छत्तीसगड मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सत्तांतर झाले सत्ताग्रहणही पूर्ण; मध्य प्रदेश - कमलनाथ, राजस्थान - अशोक गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

छत्तीसगडमध्ये भाजप गेली 15 वर्षे सत्तेत आहे. मात्र या विधानसभा निवडणूकीने सर्व चित्र पालटले. छत्तीसगडमध्ये टी.एस.सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते.