पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या (Bhabanipur Assembly Bypoll) निकालाकडे आज सार्यांचे लक्ष लागले होते. आता अखेर हा निकाल जाहीर झाला असून मतदारांनी ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) बाजूने कौल दिला आहे. भवानीपूर पोटनिवडणूकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा 58,832 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या विजयामुळे त्यांचं पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहिलं आहे.
दरम्यान ममता बॅनर्जी काही महिन्यांपूर्वी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघामधून भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात लढल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन केली होती. नंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता झालेल्या या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवला आहे. भवानीपूर मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरूद्ध भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचं आव्हान होतं. नक्की वाचा: West Bengal: ममता बॅनर्जी पुन्हा रिंगणात, नंदीग्राम येथील पराभवानंतर भवानीपूर येथून 'पुनश्च हरीओम'.
ANI Tweet
Since the elections started in Bengal, Central Govt hatched conspiracies to remove us (from power). I was hurt in my feet so that I don't contest the polls. I am grateful to the public for voting for us & to ECI for conducting polls within 6 months: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/eMIS1rW2V9
— ANI (@ANI) October 3, 2021
भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपारिक मतदार संघ आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत येथून विजय मिळवला आहे. ममता दींदींच्या विजयानंतर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. टीएमसी कार्यकर्ते आणि समर्थक देखील मोठ्या उत्साहात पश्चिम बंगाल मध्ये सध्या सेलिब्रेशन करत आहेत.