Kamalnath | Twitter

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 230 आणि  छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये 70 जागांवर आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू झाले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेले मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्यप्रदेशात भाजपा आपली सत्ता राखत शिवराज सिंग चौहान पाचव्यांदा सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर कॉंग्रेस कडून भाजपाला दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे छत्तीसगड मध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील 70 जागांसाठी मतदान सुरू आहे. नक्षलग्रस्तांचा या भागात प्रभाव असल्याने विशेष खबरदारी घेत निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.71% आणि मध्य प्रदेशात 11.13% मतदान झाले.

आज सकाळी मध्यप्रदेश मध्ये नागरिकांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांग लावल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये कमलनाथ यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि छिंदवाडा येथील पक्षाचे उमेदवार कमलनाथ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये  "मध्य प्रदेशातील मतदारांमध्ये खूप उत्साह आहे. त्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे आहे.' असं म्हटलं आहे. तर शिवराज सिंग चौहान यांनी मतदानापूर्वी देवदर्शन केले अअहे. सपत्निक ते मंदिरात दर्शनाला गेले होते.  Show-Cause notice to Priyanka Gandhi Vadra: 'PM Narendra Modi यांचा प्रियंका गांधींच्या वक्तव्यामुळे अपमान', BJP च्या तक्रारीवरून Election Commission कडून प्रियंका गांधींना नोटीस .

कमलनाथ

शिवराज सिंग चौहान

प्र्ल्हाद सिंह पटेल

छत्तीसगड मध्ये आज दुसऱ्या टप्प्यात 70 जागांसाठी एकूण 958 उमेदवार रिंगणात असून मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी एस सिंग देव, राज्यातील आठ मंत्री रिंगणात आहेत. सध्या देशात 5 राज्यांमध्ये निवडणूका होत आहेत. या पाचही निवडणूकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.