Amul Dairy Election 2020: गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत पराभव, काँग्रेसची एकहाती सत्ता, पाहा अमूल डेअरी निवडणूक निकाल
BJP,Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अनेक निवडणुकांमध्ये काट्याची टक्कर देऊनही पराभव पदरी पडणाऱ्या काँग्रेसने भाजपला गुजरातमध्ये धक्का दिला आहे. अमूल डेअरी (Amul Dairy) नावाने प्रसिद्ध असलेल्या कायरा डिस्ट्रिक्ट कोआपरेटिव मिल्क प्रोडक्शन यूनियन लिमिटेड (Kaira District Cooperative Milk Producers' Union) चे प्रतिनिधित्व करणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडणूक 2020 (Amul Dairy Election 2020) मध्ये भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. तर काँग्रेस पक्षाने मात्र एकहाती सत्ता मिळवली आहे. अमूल डेअरीसाठी (KDCMPU Ltd Election 2020) पंचवार्षीक निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 11 जागांपैकी काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सहाजिकच अमूल डेअरी काँग्रेच्या एकहाती ताब्यात गेली आहे. या निवडणुकीसाठी शनिवारी (22 ऑगस्ट) मतदान तर आज (1 सप्टेंबर) मतमोजणी झाली.

अमूल डेअरी निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. ज्यात भाजपचा पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्री गृहमंत्री, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह हे गुजरातमधून येत असल्याने या राज्यातील कोणताही निवडणूक अलिकडे प्रतिष्ठेची होते. प्रसारमाध्यमांचेही त्याकडे बारीक लक्ष असते. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: स्वबळावर नव्हे! मित्र पक्षांसोबत भाजप लढणार बिहार विधानसभा निवडणूक, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी)

अमूल डेअरी बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडणूक 2020 साठी उमेदवार असलेले भाजप आमदार केसरसिंह सोलंकी यांना काँग्रेसच्या संजय पटेल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पटेल यांनी 2017 मध्ये सोळंखी यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढली होती. आनंद येथून काँग्रेस आमदार कांती सोढा परमार हे 41 मतांनी विजयी झाले आहेत. बोरसद येथून काँग्रेस आमदार राजेंद्रसिंह परमार बोरसद अंचल सीट येथून विजयी झाले. परमार हे अमूलचे उपाध्यक्षही राहिले आहेत.

काँग्रेस पक्षातील इतर विजयी उमेदवारांमध्ये खम्भात येथून सीता परमार, पेटलाद येथून विपूल पटेल, कथलल येथून घीला जला, बालासिनोर येथून राजेश पाठक आणि महमदवद येथून गौतम चौहान आदी उमेदवार विजयी झाला आहेत.