संसदेमध्ये अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तवावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान शाह यांनी तातडीने विरोधकांचा समाचार घेत एका पत्रकार परिषदेमधून आपली बाजू मांडत आपल्याबद्दल चूकीचा समज पसरवला जात असून निवडक वाक्यांवरून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ( 18 डिसेंबर) कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मागणी केलेल्या राजीनाम्याला प्रत्युत्तर देताना खडे बोल सुनावले आहे. 'मी राजीनामा जरी दिला तरी त्याने कॉंग्रेसचे नशीब पालटणार नाही' असे शाह म्हणाले आहे. कॉंग्रेसला पुढील अजून 15 वर्ष तरी विरोधी बाकांवरच बसायचं आहे असे ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू .
अमित शाह यांचे प्रत्युत्तर
मेरा इस्तीफ़ा लेकर क्या करोगे, अभी 15 साल कांग्रेस को विपक्ष में ही बैठना है -अमित शाह जी 🔥
जो आगे लाइन में है, वो सत्ता में आ गए तो ये कांग्रेस मोदी-शाह को संत बताया करेंगे। pic.twitter.com/2lt0hCKhMG
— Baliyan (@Baliyan_x) December 18, 2024
अमित शाह यांचे खरगेंना प्रत्युत्तर
माझा राजीनामा मागून खरगेंना आनंद होत असेल. मी राजीनामा दिला तरीही त्यांचे प्रश्न संपणार नाहीत. कारण त्यांना अजून 15 वर्ष विरोधी बाकांवरच बसायचे आहे.
दरम्यान अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्याचा धिक्कार करत माफीची आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी जर खरंच आंबेडकरांचा आदर करत असतील तर त्यांनी तातडीने शाहांना हटवावे असे खरगे म्हणाले आहेत. शाहांच्या वक्तव्यांनी लोकं दुखावली आहेत शाहांना न हटवल्यास आंदोलनं होतील.
अमित शाह यांच्या कोणत्या वक्तव्यावरून गदारोळ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानावर चर्चा करताना 'सध्या एक फॅशन आहे ज्यात आंबेडकर, आंबेडकर.... केलं जातं. इतकं नाव देवाचं घेतलं तर सात जन्म स्वर्ग मिळेल.' कॉंग्रेसने अमित शाह यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत हा विधान अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.
आज पत्रकार परिषदेमध्ये अमित शाह यांनी कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांना कशी वागणूक दिली याचा पाढा वाचून दाखवला आहे.