Photo Credit: X

यूके निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे  शेवटचे भाषण दिले. भाषण देताना यूकेच्या पंतप्रधानांच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे सध्या खूप ट्रोल होतायत . भारतीय अब्जाधीश आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी सुनक यांच्या पत्नीने या कार्यक्रमासाठी निळा, पांढरा आणि लाल पॅटर्नचा ड्रेस परिधान केला होता. अक्षताचा हा ड्रेस इंटरनेटवर चर्चेचा मुद्दा बनला आहे.( हेही वाचा:Rishi Sunak यांनी दिला UK PM पदाचा राजीनामा; लवकरच Conservative Leader वरूनही होणार पायउतार)

नेमके काय घडले? 

अक्षता मूर्ती यांनी जो ड्रेस परिधान करुन उभ्या होत्या त्या ड्रेसच्या किंमतीवरुन ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.42,000 रुपये किमतीच्या तिच्या ड्रेसमध्ये सर्व रंग होते  निळा, पांढरा आणि लाल जो यूकेच्या ध्वजावर आहे आणि खाली दिशेने निर्देशित बाणाचा पॅटर्न होता आणि तो नेटिझन्सच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला. नेटिझन्सनी डाउनवर्ड पॉइंटिंग ॲरो आणि यूके निवडणुकीत सुनकच्या पक्षाची कामगिरी यांच्यातील समांतर चित्र काढले.

 

 

 

ट्रॉलर्स काय म्हणाले?

एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, सूनकच्या पत्नीने #GeneralElection2024 मध्ये टोरी मताचे प्रतिनिधित्व करणारा ड्रेस परिधान केला आहे. तर दूसरा म्हणाला अक्षता मूर्तीचा ड्रेस हा एक QR कोड आहे जो तुम्हाला डिस्नेलँड फास्ट पास देतो. तर काहींनी निरोपाचं भाषण करायला आलेल्या पतीसह इतका महागडा ड्रेस परिधान करुन अक्षता मूर्ती कशा काय उभ्या राहिल्या यावरुन त्यांना ट्रोल केलं आहे.टेलिग्राफमधील एका वृत्तानुसार, अक्षता मूर्तीने भारतीय डिझायनरचा ड्रेस परिधान केला होता ज्याची किंमत 395 पौंड ( म्हणजेच भारतीय रुपये अंदाजे 42,000 रुपये) होती.