Ajit pawar CM Banner (Photo Credit twitter)

Deputy CM Ajit Pawar:  जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचपार्श्वभूमीवर राज्यातील पिंपरी चिंचवड (Pimpari chinchwad) येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party OF India) सचिन खरात गटाकडून अजित दादा (Ajit Pawar ) तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune Mumbai Express Highway) देखील उर्से टोलनाक्यावर 15/250 फुटाचे बॅनर लावण्यात आलेले दर्शनास आले आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राज्यातील अनेक नेत्यांना त्यांनी मुख्यमंत्रा व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे बॅनर देखील लावण्यात आलेले.  पुण्यात हे बॅनर निदर्शनास आल्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर राज्य सरकारने त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. आता मंत्रिमंडळातील खाते वाटप झाल्यानंतर त्यांना अर्थमंत्री पद देण्यात आलंं आहे. दरम्यान लवकर मुख्यमंत्री व्हा, अश्या आशयाचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये हे बॅनर दिसल्यामुळे दादांची हवा  असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अण्णा बनसोडे यांच वक्तव्य

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक नेत्यानी आणि लोकांनी देखील त्यांनी मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांसंदर्भात वक्तव्य केल आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं आमचं ध्येय आहे, म्हणूनच आम्ही या सत्तेत सहभागी झालो आहोत, अजित पवार हे कायम राज्यातील विकासावर भर देतात. राष्ट्रवादीचे प्रत्येक नेते आणि आमदार आपल्या भागात रखडलेल्या कामांवर लक्ष देत आहेत. ती सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे आणि प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे या हेतूने सगळे अजित पवारांच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.