Lok Sabha Elections 2019 ABP Majha-Nelson Exit Poll Live Streaming: एबीपी माझा चा एक्झिट पोल कुठे पहाल लाईव्ह?
Lok Sabha Elections 2019 Exit Polls (Photo Credits: File Photo)

Lok Sabha Elections Exit Polls 2019: गेल्या महिन्याभरापासून देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीचे (Loksabha Elections 2019) नगारे वाजत आहेत. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार होते. महाराष्ट्रातील मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आज देशातील मतदानाचा अंतिम आणि सातवा टप्पा पार पडला. मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर देशातील जनतेसह नेतेमंडळींनाही निकालाबाबत उत्सुकता आहे. या निकालासंबंधित अंदाज आज (19 मे) एक्झिट पोलच्या आधारे लावण्यात येणार आहे. तर जनमताचा कौल कोणत्या राज्यात नेमका कोणत्या पक्षाकडे झुकतो, हे अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. एबीपी नेल्सन सोबत एक्झिट पोल सादर करणार आहे.

एबीपी माझा चा एक्झिट पोल कुठे पहाल?

एबीपी माझा सह इतरही वृत्तवाहिन्या एक्झिट पोल द्वारे निवडणूकीच्या निकालाचे अंदाज व्यक्त करतील. मात्र 'एबीपी माझा'चा लाईव्ह एक्झिट पोल खाली पहा...

देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले.

तर महाराष्ट्रात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल या चार दिवसात चार टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 19 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यावर जनमताचा कौल स्पष्ट होईल.