शीखविरोधात दंगल प्रकरणातील आरोपी सज्जन कुमार यांना जन्मठेप, काँग्रेसला दणका
काँग्रेस नेते सज्जन कुमार (फोटो सौजन्य- ANI)

1984 Anti-Sikh Riots: दिल्लीच्या उच्च न्यायालयाने 1984 रोजी झालेल्या शीख धर्मियांविरोधातील दंगल प्रकरणातील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना दोषी ठरविले आहे. तर दंगल भडकवल्यामुळे आणि या दंगलीमध्ये त्यांचा हात असल्याने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र कनिष्ठ न्यायालयाने त्यांना निर्दोषी ठरविले होते. मात्र कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाची याचिकार्त्यांनी फेटाळणी करुन न्यायलयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

आज उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे काँग्रस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर 31 डिसेंबर पूर्वी त्यांना शरण येण्याचे न्यायलयाने आदेश दिले आहेत. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये झालेल्या शीखांविरोधातील दंगल प्रकरणातील आरोपी यशपाल सिंह याला न्यायालयाने फाशीची शिक्षा आणि दुसरा आरोपी नरेश सहरावत याला जन्मठेपेची शिक्षा देण्याता आली होती.

अकाली दलाकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी

शरोमणि अकाली दलाचे नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्याबद्दल न्यायालयाचे धन्यवाद मानले आहे. तसेच आरोपी सज्जन कुमार आणि जगदीश टायलर यांना मरणाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत यांच्याविरुद्ध आमची लढाई चालू राहणार असे सांगितले आहे.