Pragati Maidan Tunnel Accident: दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यात भीषण अपघात, पोलिस उपनिरिक्षकाचा मृत्यू
Delhi Pragati Maidan Accident PC TWITTER

Pragati Maidan Tunnel Accident: नवी दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पोलिस उपनिरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस आपल्या दुचाकीवरून जात होते. यादरम्यान त्यांची दुचाकी घसरली आणि ते थेट दुभाजकाला धडकला. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाला होता.   (हेही वाचा- पर्यटकांच्या टॅक्सीचा भीषण अपघात, नदीत कोसळल्याने दोन जण बेपत्ता, बचाव कार्य सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रगती मैदानात बोगद्यात हा अपघात घडला. एनके पवित्रन असं अपघातात मृत झालेल्या पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाले आहे. बोगद्यातून जाताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी थेट दुभाजकावर आदळली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ  लेडी हार्डिंग  रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या अपघाताचा  तपासात गुंतले आहेत.

पोलिस ठाण्यातील काम आपटून घरी जात असताना ही घटना घडली. एनके पवित्रन हा दिल्ली पोलिसांच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या क्राईम टीमचा एक भाग होता आणि तो आय एक्स्टेंशनचा रहिवासी होता. दिल्ली पोलिस या अपघाताचा तपास करत आहे.