Tourist Taxi Falls Into River: पर्यटकांच्या टॅक्सीचा भीषण अपघात, नदीत कोसळल्याने दोन जण बेपत्ता, बचाव कार्य सुरु
Jammu kashmir Accident PC TWITETR

Srinagar Accident: जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांनी भरलेली टॅक्सी नदीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात श्रीनगर सोनमर्गजवळ घडला. टॅक्सी नदीत पडल्याने यात चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर इतर दोन जण जखमी आहे आणि दोन जण बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी बचाव कार्य सुरु झालं. बर्फाळ रत्यातून जाताना टॅक्सी अनियंत्रित झाली होती त्यामुळे हा घात झाला.(हेही वाचा- चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांचा पाय घसरला, महिला रेल्वे पोलिसांने वाचवले जीव)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सिंध नदीजवळून जात असताना ही घटना घडली. टॅक्सी तवेरा सोनमर्ग जिल्हा गांदरबल येथील गगेनगीर येथील नदीत कोसळली. नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे टॅक्सीतील प्रवाशी वाहून गेले. सिंध नदीजवळ अपघाताची माहिती मिळताच, सीआरएफ जवान ( बचाव कार्य ) आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर जोरदार बचाव कार्य सुरु आहे. ड्रॉयव्हरला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दोन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरु आहे. बचावकार्य नदीत त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, टॅक्सीत नऊ पर्यटक प्रवास करत होते. परिसरात या अपघातानंतर गोंधळ निर्माण झाले. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या पर्यटकांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती पोलिसांनी दिली.