Lady Cop Saves Man PC TWITTER

Lady Cop Saves Man: उत्तराखंड येथील लश्कर रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या एका महिला पोलिसाने प्रवाशाचे जीव वाचवले आहे. प्रवाशी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढत होता त्यावेळीस त्याचा तोल गेला आणि खाली पडला. सुदैवाने, अपघातात प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिला रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला वाचवल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करत आहे.  ही घटना २४ एप्रिल रोजी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्ता - जम्मू तवी एक्स्प्रेमध्ये प्रवाशी चढत होता. ट्रेन हळू हळू पुढे जात होती. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळीस अचानक त्याचा पाय सरकला तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉमच्या मधल्या गॅपमध्ये पडला. हे पाहचा रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या महिला रेल्वे पोलिस धावत मदतीसाठी आल्या. त्यांनी चतुराईने प्रवाशाला वाचवले.

रेल्वे पोलिसांनी प्रवाश्याला पकडून धरले होते. इतर प्रवाशांनी देखील धाव घेतली. पुढे जाऊन ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. उमा असं महिला रेल्वे पोलिसाचे नाव आहे. प्रवासी खाण्यापिण्याचे सामान घेण्यासाठी स्टेशनवर उतरल्याचे सांगण्यात येत आहे. महिला रेल्वे पोलिसांनी मोठा अपघात होण्यापासून वाचवले आहे. वृत्तानुसार, अंबालाजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबहून येणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कोलकत्ता जम्मू तवी एक्स्प्रेस देखील उशिरा धावत होती. प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही घटना घडली.