भारताबाहेरही पंतप्रधानांची लाट; नरेंद्र मोदी ठरले 'जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती', डोनाल्ड ट्रम्प, पुतीन यांना टाकले मागे
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपले महत्व दाखवून दिले. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती (World’s Most Powerful Person 2019) बनले आले आहेत. ब्रिटीश हेराल्ड (British Herald) रीडर्सने केलेल्या मतदानानुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 2019 च्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या स्पर्धेत नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतिन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात तगडी चुरस रंगली.

या मतदानात नरेंद्र मोदी यांना 31 टक्के मते मिळाली आहेत, पुतिन यांना 29 टक्के, तेसार्या स्थानावर डोनाल्ड ट्रम्प असून त्यांना, 21.1 टक्के आणि शी जिनपिंग यांना 18.1 टक्के मते मिळाली आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये 25 लोकांना नामांकित करण्यात आले होते, यामधील नरेंद्र मोदी एक होते. अंतिम फेरीसाठी नरेंद्र मोदी, पुतिन, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग या नावांचा विचार करण्यात आला. (हेही वाचा: नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे गोड सेलिब्रेशन,आईस्क्रीम विक्रेत्याने साकारली मोदींच्या चेहऱ्याची सीताफळ कुल्फी (Watch Video))

ब्रिटिश हेराल्ड वाचकांनी वन-टाइम पासवर्डद्वारे आपली मते नोंदवली. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात घेतलेली कठोर भूमिका, बालाकोटमध्ये केलेला एअर स्ट्राईक या घटनांनंतर मोदी यांचे समर्थक वाढल्याचे ब्रिटिश हेरॉल्डमध्ये प्रकाशित होणाऱ्या लेखात नमूद करण्यात आले आहे. सोबतच नरेंद्र मोदी यांनी आपल्या काळात ज्या योजना सुरु केल्या याचाही फायदा त्यांच्या लोकप्रियतेसाठी झाला.