PM Modi Election Results Speech: चार राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. येथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एनडीए आघाडीचा विजय हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले. हा विजय भारतीय राज्यघटनेवरील अतूट निष्ठेचा विजय आहे, विकसित भारताच्या वचनाचा हा विजय आहे, सबका साथ-सब विकास या मंत्राचा विजय आहे, हा 140 कोटी भारतीयांचा विजय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच जाणून घ्या पंतप्रधान मोदींनी भाषणात कोणत्या पाच मोठ्या गोष्टी सांगितल्या-
जाणून घ्या, काय म्हणाले मोदी
2- तिसऱ्या टर्ममध्ये देश मोठ्या निर्णयांचा अध्याय लिहिणार: PM मोदी म्हणाले की, तिसऱ्या टर्ममध्ये देश नवीन निर्णयांचा अध्याय लिहील आणि ही मोदींची हमी आहे. या निवडणुकीतील विजयामुळे एनडीए सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे.
3- विजयाचे श्रेय नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना: पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला मोठे यश मिळाले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. यावेळी पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले.
4- निवडणूक आयोगाचे कौतुक : पंतप्रधान मोदींनी देशात निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक केले. हा 140 कोटी भारतीयांचा विजय असल्याचे ते म्हणाले. आज मी देशाच्या निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करेन. निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठी निवडणूक इतक्या सक्षमपणे पार पाडली. सुमारे 100 कोटी मतदार, एक कोटी मतदान कर्मचारी आणि 11 लाख बूथवर असलेल्या जवानांनी अशा कडक उन्हात आपले कर्तव्य चोख बजावले.
5- ओडिशा-आंध्रमधील विजयाने पंतप्रधान मोदी आनंदित: ओडिशा-आंध्रमधील विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगन्नाथाच्या भूमीवर भाजपचा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असेल. केरळमध्येही भाजपने जागा जिंकल्या आहेत. तेलंगणात आमची संख्या दुप्पट झाली आहे. आमच्या पक्षाने मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल अशा अनेक राज्यांमध्ये क्लीन स्वीप केला आहे. केंद्र सरकार विकासात कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही मी देतो.