पी.व्ही.सिंधू ही भावी खेळाडूंसाठी प्रेरणादायी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
PV Sindhu (File Photo)

पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने जागतिक बॅडमिंटन चॅम्पीयनशीप (Badminton World Championship) मध्ये विजय मिळवला आहे. या स्पर्धेत सिंधू हिने जपानची नोजोमी ओकाहुरा हिला हरवले आहे. त्याचसोबत ही स्पर्धा जिंकरणारी सिंधू ही प्रथमच भारतीय खेळाडू आहे. तर सिंधू हिने मिळवलेल्या विजयावर आता सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुद्धा सिंधू हिला तिच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, पी.व्ही सिंधू हिने पुन्हा एकदा भारताचे नाव रोशन केले आहे. तसेच जागितक बॅडमिंट स्पर्धेत सिंधूला विजय मिळाल्याने शुभेच्छा. सिंधू हिचे बॅडमिंटन खेळासोबतची समर्पित भावना ही खरच प्रेरणादायी आहे. एवढेच नसून सिंधू ही भावी पिढीतील अन्य खेळाडूंसाठी सुद्धा एका प्रेरणास्थान बनेल अशा शब्दात तिचे कौतुक नरेंद्र मोदी यांनी केले आहे.(पी.व्ही. सिंधू ठरली 'जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप' ची मानकरी, स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू)

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा सिंधू हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

तर क्रिकेटचा देव म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने सुद्धा पी.व्ही. सिंधू हिचे कौतुक केले आहे.

या स्पर्धेत सिंधू हिने जपानची नोजोमी ओकाहुरा हिला पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे सिंधू हिला सुवर्णपदकाने गौरवण्यात आले आहे. नोजोमी ओकुहारा हिच्या विरोधात सिंधू हिने 21-7, 21-7 अशा गुणांची खेळी करत विजय मिळवला आहे. तर जागतिक बॅडमिंटन चॅम्पीयनशीपवर नाव कोरणारी सिंधू हिने भारताचे नाव या पुरस्कारावर कोरले आहे