Pilibhit Bus Accident: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बस उलटल्याने 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जात असलेल्या बसचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यानंतर बसमध्ये आरडाओरडा झाला. बसमधील अनेक लोक जखमी झाले होते. जे बिहारचे रहिवासी आहेत. या घटनेची माहिती देताना, पिलीभीत जिल्ह्यातील घुंगचाई पोलिस स्टेशनचे प्रभारी दीपक कुमार म्हणाले की, बस नवाबगंज आणि बरेली जिल्ह्यातील आसपासच्या गावांमधून सुमारे 60 कामगारांना बिहारमधील एका भट्टीवर घेऊन जात होते. दरम्यान, बस नियंत्रणाबाहेर गेल्याने उलटली. त्यामुळे हा अपघात झाला.
बसमध्ये होते 60 प्रवासी:
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 60 मजूर प्रवास करत होते. यामध्ये 25 कामगार जखमी झाले. ज्यामध्ये रुखसाना आणि जन्नती बेगम नावाच्या दोन महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
उर्वरित जखमींवर सामुदायिक आरोग्य केंद्र पुरणपूर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले.