भारताने केलेल्या वायुहल्ल्याचे पाकिस्तानने (Pakistan) प्रतिउत्तर देत त्यांचे एक विमान भारताच्या सीमेवर घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) त्या विमानाला हवेतच पिटाळून लावले. या कारवाईनंतर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी एअर स्ट्राईक बाबत म्हणत असे सांगितले की, पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले होते. तसेच वायुसेनेने उद्ध्वस्त केलेले विमान पाकिस्तानमध्ये जाऊन कोसळले आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या विमानाला उद्ध्वस्त केले असल्याची माहिती दिली होती. परंतु पाकिस्तान ही गोष्ट मान्य करण्यास नकार देत आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टनुसार आता पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.
पाकिस्तानाचे लढाऊ विमान F-16 चे फोटो पाकिस्तान अधिकृत काश्मिर (POK) येथून समोर आली आहेत. बुधवारी या विमानाला वायुसेनेने उद्ध्वस्त केले होते. या फोटोमध्ये पाकिस्ताचे 7 कमांडर ऑफिसरही दिसून येत आहेत. मात्र आता पाकिस्तानने हे त्यांचेच विमान असल्याचे मान्य केले आहे.(हेही वाचा-India-Pakistan Tension: जैश-ए-मोहम्मदच्या 'मसूर अझहर'ला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव; अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची भारताला साथ)
Sources: Picture of portion of downed Pakistani Air Force jet, wreckage was in Pakistan Occupied Kashmir. Also seen in pic, Commanding Officer of Pakistan’s 7 Northern Light Infantry pic.twitter.com/sCbzmtqjgB
— ANI (@ANI) February 28, 2019
दरम्यान, बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विदेश परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी असे सांगितले की, या हल्ल्यात भारताचे मिग-21 विमानाला अपघात झाला.तर भारतीय वायुसेनेचा एक पायलट हरवला असल्याची सुद्धा माहिती दिली होती. परंतु पाकिस्तानने त्यांचाकडे वायुसेनेचे दोन कमांडर असल्याचे म्हटले होते. मात्र पाकिस्तानचा हा दावा ही फोल ठरला. नंतर स्व:ताच त्यांनी भारतीय वायुसेनेचा एक कमांडर असल्याची कबुली दिली आहे.
महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.