Petrol Diesel Price Today: क्रूड ऑईलच्या (Crude Oil Market) किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी लंडन एक्सचेंजमध्ये ब्रेंट क्रूडने 64 डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार केला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol & Diesel) भडका उडाला आहे. गुरुवारी पेट्रोल 34 पैशांनी वाढून 89.88 रुपये झाले असून डिझेलच्या दर 32 पैशांनी वाढून 80.27 रुपये प्रति लिटरवर आला आहे. सध्या, दोन्ही इंधनाचे दर जवळजवळ प्रत्येक शहरात वाढले आहेत.
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पेट्रोल तब्बल 22 दिवसांसाठी महाग झाले आहे. परंतु या दिवसांत ते 06.07 रुपयांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.32 रुपयांवर पोहोचली आहे. जी मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोल 100.79 रुपयांवर विकले जात आहे. यासह, जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल ऑलटाइम उच्च किमतीवर गेले आहे. यापूर्वी मागील वर्षाच्या उत्तरार्धातही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांत पेट्रोलच्या किंमत प्रति लिटर 19 रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे. (वाचा - LPG Subsidy Status Online: गॅस सिलेंडर ची सबसिडी किती मिळणार हे कसे पहाल?)
दरम्यान, पेट्रोलसह डिझेलची किंमतीनेही रेकॉर्ड मोडले आहे. बुधवारी डिझेल 25 पैशांनी वाढले. तसेच आज डिझेल पुन्हा 32 पैशांनी महाग झाले आहे. नवीन वर्षात 22 दिवसांत डिझेल प्रति लिटर 06.40 रुपयांनी महाग झाले आहे. भोपाळमध्ये 88.49 रुपये दराने डिझेलची विक्री होत आहे. गेल्या 10 महिन्यांत डिझेलची किंमत सुमारे 17 रुपयांनी वाढली आहे.
Petrol and diesel prices in Delhi stand at Rs 89.88/litre (increase by 34 paise) and Rs 80.27/litre (increase by 32 paise), respectively
(file photo) pic.twitter.com/7rlGqJrBzW
— ANI (@ANI) February 18, 2021
भारत आणि चीनसह आशियाई देशांमध्ये कच्च्या तेलाची मागणी निरंतर वाढत आहे. यामुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या बाजारात वाढ झाली. लंडन क्रूड ऑईल एक्सचेंजवर बुधवारी डब्ल्यूटीआय क्रूड 0.66 डॉलर वाढून 61.80 डॉलर प्रति बॅरलवर आला. तसेच ब्रेंट क्रूडची किंमतही खूपचं वेगाने वाढत आहे. ते प्रति बॅरल 0.99 डॉलर वाढून 64.34 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.