पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या 15 दिवसांपासून वाढ कायम आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट झाली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 79.23 रूपये प्रती लिटर आहे. तर, डिझेल 78.26 रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 86.04 रूपये प्रती लिटर आहे. तर, डिझेल 76.69 रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे
चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः 82.58 रूपये आणि 80.95 प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः 75.80 रूपये आणि 73.61 रूपये प्रती लिटर आहे. रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. देशात पेट्रोल आणि डिझेलवरील कर 69 टक्के झाला आहे. हे देखील वाचा- Petrol And Diesel Prices in India: सलग 14 व्या दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ कायम; 20 जून रोजी मुंबई, दिल्ली यांसारख्या महत्त्वांच्या शहरांमध्ये काय आहेत इंधनाचे दर? जाणून घ्या
पाहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:
शहर | पेट्रोल दर | डिझेल दर |
मुंबई | रु. 86.04 | रु. 76.69 |
दिल्ली | रु. 79.23 | रु. 78.27 |
चेन्नई | रु. 82.58 | रु. 75.80 |
कोलकाता | रु. 80.95 | रु. 73.61 |
लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते. त्यानंतर 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.