भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढवले आहेत. सलग 14 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमधील वाढ कायम आहे. दिल्लीमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती 0.51 रुपये प्रति लीटरने वाढल्या असून डिझेलच्या किंमतीत लीटरमागे 0.61 रुपयांची वाढ झाली आहे. या नव्या दरवाढीमुळे दिल्लीतील पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 78.88 रुपये प्रति लीटर आणि 77.67 रुपये प्रति लीटर इतके आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 9 जून पासून सुमारे 5.88 रुपये आणि 6.50 रुपये इतकी वाढ झाली आहे. इंधनाच्या किंमती संपूर्ण देशात वाढल्या असून लोकल सेल टॅक्स किंवा व्हॅटनुसार त्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या असून पेट्रोल 85.21 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 75.53 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे. दरम्यान पेट्रोलियम कंपन्या 7 जून पासून इंधनाचे दर वाढवत आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 81.82 लीटरने मिळत असून डिझेल 74.77 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 80.13 रुपये तर डिझेलचे दर 72.53 रुपये प्रति लीटर इतके आहेत.
पहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:
शहरं |
पेट्रोल दर |
डिझेल दर |
मुंबई | रु. 85.21 | रु. 75.53 |
दिल्ली | रु. 78.88 | रु. 77.67 |
चेन्नई | रु. 81.82 | रु. 74.77 |
कोलकाता | रु. 80.13 | रु. 72.53 |
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते. त्यानंतर 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.