सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-diesel rate) जाहीर केले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तेलाच्या किमतीत 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी, कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचे झाले तर इथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल झाला आहे. मात्र, महाराष्ट्राचा समावेश अशा राज्यांच्या यादीत करण्यात आला आहे जिथे दीर्घकाळापासून पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर रुपये मिळत आहे. तर पुण्यात पेट्रोल 110.28 रुपये तर डिझेल 93.04 रुपये प्रति लिटर रुपयाने विकले जात आहे.
देशाची राजधानी दिल्लीत आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलसाठी 95.41 रुपये मोजावे लागणार आहेत, तर एक लिटर डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत, ही भारतातील पेट्रोलियम कंपन्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. हेही वाचा 7th Pay Commission: लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली होळीची भेट; आता केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
नायमॅक्सवर कच्चे तेल प्रति बॅरल $0.59 वाढल्यानंतर $97.24 प्रति बॅरलवर आले आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.74 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल $100.65 वर व्यापार करत आहे. 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिल्यानंतर मंगळवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $ 99.84 प्रति बॅरलवर नरमल्या. यामुळे किरकोळ तेल कंपन्यांवरील मार्जिनचा दबाव कमी झाला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढूनही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.
मंगळवारी ब्रेंट क्रूड सात टक्क्यांनी घसरले. यापूर्वी, 28 फेब्रुवारी रोजी ते प्रति बॅरल $ 100 वर गेले होते आणि 7 मार्च रोजी प्रति बॅरल $ 139 या 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले होते. .सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी विक्रमी 131 दिवसांसाठी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी बदलल्या नाही.