Ram Gopal Yadav On Instagram Reels (PC - X/@ians_india)

Ram Gopal Yadav On Instagram Reels: समाजवादी पक्षाचे खासदार प्रोफेसर राम गोपाल यादव (Ram Gopal Yadav) यांनी मंगळवारी राज्यसभेत (Rajya Sabha) शून्य प्रहरादरम्यान इंस्टाग्राम रील (Instagram Reels) चा मुद्दा उपस्थित केला. 'लोक असे कपडे घालतात की नजर खाली करावी लागते', असं संतापजनक वक्तव्य राम गोपाल यादव यांनी संसदेत केलं आहे. कोणत्याही समाजात नग्नता आणि दारूबंदी वाढली तर अनेक संस्कृती नष्ट होतात. हे थांबवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी यादव यांनी केली. तसेच जनसंघाच्या काळापासून भारतीय सभ्यता आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या घोषणेची आठवणही करून दिली.

राम गोपाल यादव म्हणाले की, आज काही व्यासपीठ अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. विशेषत: इंस्टाग्राम रील बनवताना हे निदर्शनासं येतं. अंदाजानुसार तरुण इंस्टाग्रामवर दररोज सरासरी तीन तास रील्स, अश्लील मालिका आणि अश्लील कार्यक्रम पाहण्यात घालवत आहेत. एकत्र बसून आणि एकत्र जेवण केल्याने जे प्रेम कुटुंबात जाणवते ते आज नाही. लोक एकत्र बसतात पण फोनवर व्यस्त असतात. रोज अशा बातम्या येत आहेत की, इंस्टाग्रामवर मैत्री झाली, लग्न झाले, मुलाने मुलीची हत्या केली. अशा घटना घडत आहेत. (हेही वाचा -Instagram Reels Craze Turned Into Death: इंस्टाग्राम रील्स क्रेझने तरुणाचा जीव घेतला, हैदराबादमध्ये आणखी एक जखमी)

यावेळी प्रोफेसर यादव यांनी ऑनलाइन क्लासेसचाही उल्लेख केला. तसेच त्यांनी सरकारने इन्स्टाग्राम रील्स, समाजात अश्लिलता आणि दारूबंदी वाढवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याची मागणीही केली. त्याचवेळी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा मुलांवर होणाऱ्या परिणामाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील पुणे येथील एका मुलाच्या आत्महत्येचाही त्यांनी उल्लेख केला आणि याबाबत नियमन करण्याची मागणी केली. (हेही वाचा, Influencer Dies During Live Broadcast: अति खाल्ल्याने 24 वर्षीय इन्फ्लुएंसरचा लाईव्ह प्रसारादरम्यान मृत्य)

पहा व्हिडिओ - 

यापूर्वी आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनीही सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरवल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सोशल मीडियावर कोणतेही बंधन नाही, असे आम आदमी पक्षाचे खासदार राज्यसभेत म्हणाले. सोशल मीडियावर कोणासाठीही काहीही लिहिले जात असल्याचे ते म्हणाले. विक्रमजीत सिंह म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याबद्दल असे काही लिहिले होते, जे आपण सभागृहातही सांगू शकत नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. अशी खाती बंद करावीत. याबाबत कायदा करावा, अशी मागणीही सिंह यांनी केली.