Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

इंस्टाग्राम रील्सच्या (Instagram Reels) क्रेझने एका तरुणाचा जीव घेतला आणि एक गंभीर जखमी झाला. ही घटना हैदराबाद (Hyderabad) येथील हयात नगरमध्ये रविवारी (21 जुलै) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिल्स बनवताना दुचाकीवर धोकादायक स्टंट (Bike Stunts) करताना घडलेल्या अपघातात दोघांचे प्राण गेले. ही घटना राचकोंडा पोलिस आयुक्तालयाच्या हयात नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेड्डा अंबरपेटजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातग्रस्त झालेले दोन्ही तरुन रिल्स बनविण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन धोकादायक स्थितीत स्टंट करत होते. ते करत असतानाच ही घटना घडली.

इंस्टाग्राम रीलसाठी स्पोर्ट्स बाईकवर स्टंट

प्राप्त माहितीनुसार, शिवा नामक एक तरुण तरुण इंस्टाग्राम रील्स साठी स्पोर्ट्स बाईकवर स्टंट करत होता. त्याचा मित्र पिलियन रायडर म्हणून बसला होता. दुर्दैवाने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही तरुणांनी हेल्मेट परीधान केले नव्हते. परिणामी अपघातानंतर डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Influencer Dies During Live Broadcast: अति खाल्ल्याने 24 वर्षीय इन्फ्लुएंसरचा लाईव्ह प्रसारादरम्यान मृत्य)

दुचाकी घसरल्याने अपघात?

पावसामुळे ओला झालेल्या रस्त्यावर स्टंट करताना दुचाकी घसरल्याने अपघात घडला असावा असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. हैदराबाद आणि आजूबाजूचे अनेक तरुण मोटरसायकलवर स्टंट करताना दिसतात. केवळ थ्रिलसाठीच नाही तर असे स्टंट ते सोशल मीडियावर अधिक लाईक्ससाठी पोस्ट करतात. हे स्टंट, अनेकदा व्यस्त रस्त्यांवर, विशेषत: आयटी कॉरिडॉर आणि महामार्गांवर केले जातात, त्यामुळे लक्षणीय धोका निर्माण होतो, असे स्थानिक नागरिक सांगतात.  (हेही वाचा -Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव (Watch Video))

'बाइक स्टंट करणे तरुणाईसाठी सामान्य'

शहराच्या मध्यभागी असलेल्या हायटेक सिटी, गचिबोवली आणि हुसेन सागरच्या आसपासच्या भागात रात्रीच्या वेळी बाइक स्टंट करणे सामान्य आहे. तिन्ही पोलिस आयुक्तालयांमध्ये पोलिसांनी वारंवार इशारा आणि कारवाई करूनही तरुणांची स्टंट करण्याचे वेड कायम आहे. अनेक उपाययोजना, कायदेशीर कारवाई करुनही तरुणाईत असलेले स्टंटचे वेड कायम असणे ही एक समस्या होऊन बसली आहे. सामाजिक घडामोडींचे अभ्यासक ही गंभीर समस्या असलयाचा ईशारा देतात.

सोशल मीडियावर रिल्स बनविण्याच्या वेडापाई तरुण अनेक चित्रविचीत्र स्टंट करतात. चीनमधील एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरचा नुकताच लाईव्ह ब्रॉडकॉस्टींग दरम्यान अति खाण्याचा स्टंट करताना पोट फुगल्याने मृत्यू झाल्यीच घटना घडली आहे.