पटना: 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' माजी पोलिस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहले...
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

सध्या संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढा देत असताना दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. बिहारच्या (Bihar) घटनेने यात आणखी भर घातली आहे. बिहारच्या पोलिस विभागातील सेवानिवृत्त डीएसपी के. चंद्रा यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. के. चंद्रा यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. याप्रकरणाची चौकशी करत असताना स्थानिक पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट देखील आढळली आहे. ज्यात त्यांनी आत्महत्या केल्यामागचे कारण लिहले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

के. चंद्रा सेवानिवृत्त झाले असून त्यांना ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 64 एन्काऊंटर केल्याची नोंद आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येच्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का लागला आहे. आज त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले आहे. आत्महत्येच्या ठिकाणी तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली आहे. ज्यात त्यांनी लिहले आहे की, ‘मला माफ करा. मानसिक तणावामुळे गेली कित्येक महिने मला झोपच लागत नाही. मला आता सगळे असह्य झाले आहे. म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय माझा मोबाईल चालूनच ठेवा. कारण घरातील सगळ्या गोष्टींना हाच नंबर देण्यात आला आहे. तब्बल 16 वर्षे झाली मी ताणावाखाली जगत आहे. दरम्यान, मी अनेक औषधोपचार उपचार पाहिले. मात्र, काहीच फरक पडला नाही. तसेच त्यांच्या कॉलनीमधील संतोष सिन्हा यांच्या त्रासामुळे मला जास्त असह्य झाले आहे. त्यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असेही त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले गेले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! बंगळूरूच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग, तर दुसऱ्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा दाखल

देशात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनेने अधिक वेग घेतला आहे. यापैकी काही जणांनी कोरोनाच्या भितीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तर, काही जणांच्या आत्महत्येमागचे कारण अद्यापही समजू शकले नाही.