हार्दिक आणि किंजल लग्न (संग्रहित-संपादित प्रतिमा)

नव्या वर्षातील तिसरे महत्वाचे लग्न आज पार पडले. प्रतिक बब्बर, अमित ठाकरेनंतर आता गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता (Patidar leader) हार्दिक पटेल (Hardik Patel) आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकला. आपली बालमैत्रीण किंजल पारीख हिच्यासोबत हार्दिकने विवाह केला आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. अगदी सध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहासाठी फार मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आले होते.

हार्दिक आंतरजातीय विवाह करणार नाही हे त्याने आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर किंजल हिच्यासोबत असलेले त्याचे नाते समोर आले. आज अगदी मोजकेच नातेवाईक आणि मित्र यांच्या सानिध्यात हा विवाह पार पडला. (हेही वाचा : ‘राज’पुत्र मितालीसोबत लग्नाच्या बेडीत; दिग्गजांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याला सुरुवात)

हार्दिक आणि किंजल हे 6 वी ते 12 पर्यंत एकत्रच शिकले आहेत. किंजल हार्दिकची बहिण मोनिका हिच्यासोबतही शिकत होती, याच दरम्यान तिचे हार्दिकच्या घरी येणे जाणे फार वाढले. ही दोन्ही कुटुंबे चंदननगरी या गावात एकत्र राहत होते.

किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती गांधीनगर येथे वकिलीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान 2015 साली पटेल समाजाला आरक्षण (Patidar reservation agitation) मिळावे यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी त्याला जेलमध्येही जावे लागले होते. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता.