Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील रामबनमधील मीरकोट भागात (Makerkote area of Ramban) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील (Jammu Srinagar National Highway) खूनी नाल्यावर (Khooni Nala) एका बांधकामाधीन लेन बोगद्याचा एक भाग कोसळला. बोगद्यात अनेक लोक अडकल्याची भीती आहे. रामबनच्या उपायुक्तांनी सांगितले की, या अपघातात 6 ते 7 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत एकाची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आहे. ऑडिट दरम्यान बोगद्याचा हा भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या ऑडिटवर कंपनीचे लोक काम करत आहेत. (हेही वाचा - Demands Survey of Jama Masjid: ज्ञानव्यापी आणि मथुरेनंतर भोपाळच्या जामा मशिदीखाली शिवमंदिर असल्याचा दावा; पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी)
10 labourers missing in tunnel collapse at Khooni Nala Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban, rescue operation underway: J&K Disaster Management Authority
— ANI (@ANI) May 20, 2022
बोगद्यासमोर उभ्या असलेल्या बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशीन्स आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहिता शर्मा घटनास्थळी असून बचाव कार्यावर देखरेख करत आहेत.