पाकिस्तानच्या (Pakistan) नापाक कृत्यामुळे भारतीय सैनिकांनी (Indian Army) काही महिंन्यापूर्वी एअर स्ट्राईक (Air Strike) करुन त्यांना मोठी अद्दल घडवली होती. तरीदेखील पाकिस्तान सुधरण्याचे नाव घेत नाही. एकीकडे पाकिस्तान भारताशी शांततेबदल बोलतो, तर दुसरीकडे भारताविरोधात कट रचत आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) हा भयंकर कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सुरक्षा दलाला याची माहीती मिळताच त्यांनी पाकिस्तानच्या वाईट योजनांवर पाणी टाकले? 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बॉर्डर अॅक्शन टीमने पीओकेच्या हाजीपूर सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी बॉर्डर अॅक्शन टीमवर लष्करी कारवाई करत पाकिस्तानाचा कट उधळून लावला आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणा यांच्याकडून पाकिस्तानातील काही कोड वर्डचा खुलासा केला होता, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी पाकिस्तानी सैन्य या कोड वर्डचा वापर करत असल्याचे समोर आले होते. हे कोड काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील एफएम ट्रान्समिशनमार्फत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेपर्यंत पोहचवले जात होते. हे देखील वाचा-पाकिस्तानचे सीमेवर समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी भारतीय सैन्य तयार: जम्मू काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांची माहिती
ANI चे ट्विट-
#WATCH Army sources: Infiltration or attempted BAT(Border Action Team) action by Pakistan on 12-13 Sept 2019, was seen&eliminated. In video, Indian troops can be seen launching grenades at Pak's SSG(Special Service Group) commandos/terrorists using Under Barrel Grenade Launchers. pic.twitter.com/KOnYJPWyV8
— ANI (@ANI) September 18, 2019
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यापासून तेथील सैनिक सतर्क आहेत. काश्मीरच्या येथून 100 हून अधिक अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याची तयारी करत आहेत. जैस-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझरचा भाऊ मुफ्ती रऊफ असगर याने 1 आणि 20 ऑगस्ट रोजी बहावलपूरमधील स्थानिक मुख्यालयात दहशतवादी मुद्द्यावर बैठक घेतली होती.