Congress leader P Chidambaram. (Photo Credits: PTI)

कॉंग्रेसचे नेते (Congress Leader) आणि माजी अर्थमंत्री (Former Finance Minister) पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांची प्रकृती खालावली असून त्यांना दिल्लीच्या (Delhi) एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पी चिदंबरम आयएनएक्स मीडिया प्रकरणात  (INX Media Case) तिहार कारागृहात (Tihar jail) ईडीच्या (ED) ताब्यात आहेत. पी. चिदंबरम हे कॉंग्रेसच्या काळात अर्थमंत्री होते. त्यावेळी आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांनी पदाचा गैरवापर केल्याचा त्यांचावर आरोप आहे.

पी. चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडे घरगुती अन्न खाण्याची मागणी केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य करुन पी. चिदंबरम यांना दिवसात एकदा घरचे जेवण खाण्याची परवानगी दिली होती. पी चिदंबरम यांनी कोर्टाला सांगितले होती की, त्यांच्या वजनात घट होत आहे आणि त्यांना घरच्या जेवणाची आवश्यकता आहे. आज सोमवारी पी चिदंबरम यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, पी चिदंबरम यांच्या पोटात कशामुळे दुखू लागले, याचे कारण अद्याप कळाले नाही. हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला युरोपिन संसदेच्या सदस्यांची टीम, 29 ऑक्टोबरला जम्मू-कश्मीर दौरा करणार

एएनआयचे ट्वीट-

कोर्टाच्या अटकेच्या आदेशानंतर जेव्हा ईडी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा चिंदबरम यांनी ईडीच्या डोळ्यात धुळ झोकत कॉंग्रेसच्या मुख्यालयात निघून गेले. तसेच त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत म्हणाले की, आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांचा काहीच दोष नाही. ही विरोधी पक्षाने रचलेले जाळे आहे.