Ashwini Vaishnav On Amrit Bharat Trains: येत्या काही वर्षांत 1,000 नवीन-जनरेशन अमृत भारत गाड्या तयार करण्याची योजना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी शनिवारी जाहीर केली. या गाड्या ताशी 250 किमीचा वेग गाठण्यास सक्षम असतील, असंही रेल्वेमंत्र्यानी यावेळी सांगितलं. PTI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतील बोलताना वैष्णव यांनी सांगितलं की, रेल्वेने वंदे भारत गाड्यांच्या निर्यातीवर काम सुरू केले आहे, पुढील पाच वर्षांत पहिली निर्यात अपेक्षित आहे.
मुलाखतीदरम्यान, वैष्णव यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकभरात रेल्वेने केलेल्या काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगतीवर प्रकाश टाकला. यामध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पूल आणि कोलकाता मेट्रोसाठी पहिला पाण्याखालील बोगदा यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Ashwini Vaishnav On Sleeper Vande Bharat: भारतात लवकरचं वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार स्लीपर सुविधा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा)
वैष्णव यांनी रेल्वेच्या सामाजिक बांधिलकीवर भर देताना सांगितले की, ते दरवर्षी अंदाजे 700 कोटी लोकांची वाहतूक करतात. तसेच दररोज 2.5 कोटी प्रवासी प्रवास करतात. जर एका व्यक्तीला घेऊन जाण्याचा खर्च 100 रुपये असेल तर आम्ही 45 रुपये आकारतो. म्हणूनच आम्ही रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सरासरी 55 टक्के सूट देतो. नवीन डिझाइन केलेली अमृत भारत ट्रेन फक्त 454 रुपयांमध्ये 1,000 किमी प्रवास देते. (हेही वाचा -Vande Bharat Express for Maharashtra: प्रवाशांसाठी खुशखबर! 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी CSMT-Solapur आणि CSMT-Shirdi वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता)
जागतिक दर्जाची ट्रेन -
आम्ही अमृत भारत ही जागतिक दर्जाची ट्रेन तयार केली आहे. ही ट्रेन कमी पैशात सेवा देते. वंदे भारत तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्यावहारिकदृष्ट्या, दर आठवड्याला एक वंदे भारत ताफ्यात जोडली जात आहे. येत्या काही वर्षांत आम्ही अशा किमान 400 ते 500 गाड्या तयार करू, असंही यावेळी अश्विनी वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं.