Rewa, Aug 30: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीला बेड्याही ठोकल्या होत्या. परंतु जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. खटकरी गावचा रहिवासी असलेला आरोपी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि धमकावल्या प्रकरणी गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी अटक केल्यानंतर गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक लाल यांनी सांगितले.[हे देखील वाचा: ऐकावं ते नवलचं! पोलिस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पाद केल्याने चोरट्याला 3 वर्षाचा तुरुंगवास]
गेल्या शुक्रवारी, अल्पवयीन मुलगी काही घरगुती कामासाठी जात असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर नराधम तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला जिथे त्याने कथितपणे मुलीला धमकी दिली आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली आणि स्थानिक न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.