हिंदू समाजाचा अर्थ भारतीय जनता पक्ष नाही, तसेच भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदूंचा विरोध करणे नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरचिटणीस भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी गोवा (Goa) येथील एका कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. तसेच राजकीय लढाई ही सुरूच राहणार असून या लढाईला हिंदूशी जोडू नका, असेही ते म्हणाले आहेत. भय्याजी जोशी म्हणाले आहेत की, हिंदुस्थानात काम करू इच्छिणाऱ्यांनी हिंदूसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. प्राचीन काळापासून हिंदुस्थानाचा उदय व पतन हिंदूंनी पाहिला आहे. त्यामुळे हिंदुस्तानाला हिंदू समाजाशी वेगळे करून पाहता येणार नाही. हिंदू नेहमीच देशाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. असे ते म्हणाले आहेत.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी रविवारी 9 फेब्रुवारी भाजपच्या संदर्भात भाष्य करून सर्वांचे लक्ष केंद्रित करून घेतले आहे. हिंदू समाजाचा अर्थ भारतीय जनता पक्ष नाही. भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाला विरोध करणे, असा होत नाही. राजकीय लढाईला हिंदूशी जोडू नका, असे ते म्हणाले आहे. तसेच भारतातील हिंदुंना देशापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. भारतासाठी हिंदुंनी मोठे योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक

एएनआयचे ट्वीट-

जर कोण इसाई धर्म समजतो आणि त्याच्या स्वीकार करत असेल तर, चांगली गोष्ट आहे. मात्र, कोणावर अत्याचार करून किंवा त्याच्या गरिबाचा फायदा घेऊन धर्मांतर करणे अगदी चुकीचे आहे. हे बरोबर नाही आहे, याचा आम्ही विरोध करतो. आपल्याकडे ईसाई धर्म स्वीकारण्याचा किंवा त्याचा विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. जर कोणी जल सरंक्षणासाठी काम करत आहे तर, यासाठी चर्चची आवश्यकता कशाला? तसेच तुम्ही चिकित्सा सेवा देत असाल तर, त्याठिकाणी चर्च उभारण्याची काहीच गरज नाही, असेही भैय्याजी जोशी म्हणाले आहेत.