Onion Price Hike: देशभरात जून महिन्यापासून टोमॅटोच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांच्या खिश्यावर परिणाम झाला आहे. टोमॅटोसोबत आणखी काही भाजीपाली महाग झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. टोमॅटो उत्पादनाची पुरवठा कमी असल्यामुळे ऑगस्ट पर्यंत आणखी भाव वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. टोमॅटोसोबत कांद्याचा भाव देखील वाढणार आहे. आणखी ग्राहकांच्या खिश्यावर फटका जाणवणार आहे.
कांद्याचा किंमती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तीन पट वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. कांद्या उत्पादन पुरवठा कमी झाल्यामुळे भाव वाढणार आहे. सप्टेबंर महिन्याच्या सुरूवातील देखील भाव कायम असेल परंतू शेवट्च्या आठवड्या पर्यंत दोन ते तीन पटीने भाव वाढण्याची शक्यता आहे. किंमत60 ते 70 रुपये प्रति कितोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशातील एक किलो कांद्याचा सरासरी भाव 27 रुपये किलो होता.कांद्याचा कमाल भाव 60 रुपये आणि किमान भाव 10 रुपये प्रति किलो होता.
ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या किमती कमी होतील असा अंदाजा वर्तवण्यात आला आहे. खरीप पिकाची आवक सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा चांगला होईल. क्रिसिल माक्रेटने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टअखेरीस बाजारपेठात रब्बी पीकांच्या साठ्यात घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे मुसळधार पावसाचा कालावधी 15 ते 20 दिवसांनी वाढेल. अशा स्थितीत बाजार पेठेत पुरवठ्याअभावी मालाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.