कौतुकास्पद! हैद्राबादमधील अडीच वर्षाच्या Aadith Gourishetty ने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर नोंदवले 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' नाव; आणखी 4 पुरस्कारावरही उमटवली मोहोर
Aadith Gourishetty Family (Photo Credit - ANI)

लहान मुलांचा मेंदू खूप तीव्र असतो. आपण सर्वांनी कदाचित ते अनुभवलं देखील असेल. लहान मुलांना कोणतीही नवीन गोष्ट अगदी सहज लक्षात येते. तसेत ते कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करतात. सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत अशा लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. हैद्राबादमधील एका अडीच वर्षाच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी (Aadith Vishwanath Gourishetty) असं या मुलाचं नाव आहे.

आदिथने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स' (World Book of Record) मध्ये आपले नाव नोंदवले आहे. आदिथला आपल्या शार्प मेमोरीमुळे हा मान मिळाला आहे. आदिथ फक्त एक वर्ष नऊ महिन्यांचा आहे. परंतु, इतक्या लहान वयात त्याने एक आंतरराष्ट्रीय आणि चार राष्ट्रीय विक्रम पुस्तकावर मोहोर उमटवली आहे. यामध्ये 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड', इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड आणि इतर दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. आदिथ रंग, आकार, प्राणी, फळे, बॉडी पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे त्वरीत ओळखतो. या वयात मुलांना हे लक्षात ठेवणे इतकं सोपे नाही. परंतु, आदिथने आपल्या तीक्ष्ण स्मृतीमुळे ते शक्य करून दाखवलं आहे. (हेही वाचा - नवजात बाळासोबत गिटार वाजवणाऱ्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल; पाहुन तुम्हीही म्हणाल So Cute)

आदिथच्या हुशारीचा त्याच्या कुटुंबियांना प्रचंड अभिमान वाटतो. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आदिथची आई स्नेहीता यांनी सांगितलं की, आदिथची बुद्धीमत्ता देशातील सर्व लोकांनाना माहित झाली आहे. ज्या काळात मुलं कविता आणि लोरी शिकतात. त्या वयात आदिथला रंग, प्राणी, फळे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची नाव समजतात. आदिथच्या क्षमतांमुळे त्याचे नाव दूरदूरपर्यंत पसरले आहे. त्याला केवळ जागतिक मान्यता प्राप्त झाली नसून प्रतिष्ठित 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये त्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

स्नेहीता यांनी आदिथ विषयी बोलताना सांगितलं की, आदिथ देव, कार लोगो, रंग, इंग्रजी अक्षरे, पाळीव प्राणी, वन्य प्राणी, शरीराचे भाग, झेंडे, फळे, घरगुती उपकरणे ओळखण्यास सक्षम आहे. तो केवळ एकदा सांगितल्यानंतर सर्व गोष्टी लक्षात ठेवतो. मी आदिथला एकदा भारताचा ध्वज दाखविला. यानंतर टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान त्यांने भारताचा ध्वज पाहून अभिवादन केले. त्यानंतर आम्हाला आदिथच्या बुद्धीमत्तेचा अंदाज आला. म्हणून आम्ही आदिथला वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रीय ध्वजांविषयी सांगितले. त्यानंतर त्याने या सर्व ध्वजांची नावे लक्षात ठेवली.