Prime Minister Narendra Modi, Amit Shah (PC-PIB/FB)

Dhulivandan 2022: देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि पारंपारिक रीतिरिवाजांमध्ये हा सण साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह देशातील अनेक राजकारण्यांनी या खास प्रसंगी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलं की, 'तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाचे सर्व रंग घेऊन येवो.' (हेही वाचा - Dhulivandan 2022 Messages: धुलिवंदनच्या दिवशी मराठी Greetings, Wishes Images, WhatsApp Stickers द्वारे मित्र-परिवारास द्या रंगाच्या सणाच्या शुभेच्छा!)

दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देताना होळीला सौहार्दाचे प्रतीक म्हटले आहे. त्यांनी म्हटलंय, 'तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद, आणि सौहार्दाचे प्रतीक असलेला हा सण तुमच्या जीवनात नवी उमेद आणि उत्साह आणू दे.'

याशिवाय रंगांच्या या सणानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांच्या आयुष्यात सुख आणि शांती नांदो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रंगांचा आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, सौभाग्य आणि नवी ऊर्जा घेऊन येवो.