Delhi: दिल्लीतील सिग्नेचर ब्रिज (Signature Bridge) चालू होऊन काही दिवस झाले. परंतु या पुलावर दुर्घटना थांबण्याचे नाव घेतच नाही आहे. त्यात काही दिवसांपूर्वी तीन मुलांचा या पुलावर दुर्दैवी मृत्यू झाला. तर पुलाबाबत आता विचित्र घटना समोर येत आहे. ती म्हणजे दिल्लीकर या पुलाचे नट आणि बोल्ट चोरी करण्याच्या पाठी पडले आहेत. त्यामुळे आता पुलाच्या बाबतीत सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.
या पुलबांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या केबलला बारा मोठे नट आणि बोल्ट लावण्यात आले आहेत. मात्र दिल्लीकरांनी आता पुलाचे नट आणि बोल्ट चोरी करण्याचे प्रयत्न सुरु केले. तर पुलाचे नट आणि बोल्ट गायब करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या पर्यटन आणि वाहतूक विकास मंडळाच्या इंजिनियर्सना या प्रकरणी धक्का बसला आहे.
या चोरीच्या प्रकरणाला थांबविण्यासाठी पुलाचे नट आणि बोल्ट यांचे वेल्डिंग करण्यात येणार आहे. तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ठेवून या प्रकरणी कटाकाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. असे प्रकार घडू नये म्हणून सुरक्षारक्षकाची ही नेमणूक करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.