
Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' (Mann Ki Baat) चा 110 वा भाग प्रसारित करण्यात आला. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी महिला आणि त्यांच्या सक्षमीकरणावर भाष्य केलं. आज महिला देशाच्या विकासात आणि प्रगतीत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आज सरकार विविध योजनांच्या मदतीने महिलांना सक्षम बनवत आहे. मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मार्चमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. 'मन की बात'चे आतापर्यंत 110 एपिसोड झाले. 'मन की बात'मध्ये देशाच्या सामूहिक शक्तीबद्दल, देशाच्या कामगिरीबद्दल बोलले जाते. एकप्रकारे हा जनतेने, लोकांसाठी, जनतेने तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र तरीही राजकीय शिष्टाईचे पालन करून लोकसभा निवडणुकीदरम्यान 'मन की बात' पुढील 3 महिने प्रसारित होणार नाही. आता जेव्हा आम्ही तुमच्याशी 'मन की बात' मध्ये संवाद साधू, तेव्हा तो 'मन की बात'चा 111 वा भाग असेल. पुढच्या वेळी 'मन की बात' ची सुरुवात 111 या शुभ अंकाने होत आहे, यापेक्षा चांगले काही असू शकत नाही.
या काळात मन की बात कार्यक्रम होणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कार्यक्रम करता येणार नाही. त्यामुळे थेट तीन महिन्यानंतरचं हा कार्यक्रम प्रसारित होईल, असंही मोदींनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Mann Ki Baat: 'पंतप्रधान मोदी हे भावासारखे आहेत'; जामा मशिदीत 'मन की बात' ऐकण्यासाठी आलेल्या मुस्लिम महिलेने दिली प्रतिक्रिया (Watch Video))
महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी
8 मार्चला आपण ‘महिला दिन’ साजरा करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा विशेष दिवस म्हणजे देशाच्या विकासाच्या प्रवासात स्त्री शक्तीच्या योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. काही काळापूर्वी आपण कल्पनाही करू शकत नव्हतो की देशातील महिला ड्रोन उडवतील, पण आता ते शक्य झाले आहे. आज देशात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री शक्ती मागे आहे. (वाचा - PM Modi Prays at Krishna’s Dwarka: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वारकेत केले स्नान; म्हणाले, 'द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता' (See Pics))
महिला आता देशाच्या कानाकोपऱ्यात नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत. आज देशात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत एवढी कामे होत असतील, तर त्यामागे समित्यांचा मोठा हात आहे. या पाणी समितीचे नेतृत्व केवळ महिलांकडे आहे. याशिवाय जलसंधारणासाठी बहिणी आणि मुली सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असंही यावेळी मोदी यांनी सांगितलं.