Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात (Mann Ki Baat) च्या 110 व्या भागाद्वारे लोकांना संबोधित केले. यादरम्यान पंतप्रधानांनी तीन लोकांशी फोनवर संवाद साधला आणि विविध सरकारी योजनांबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. दरम्यान, जामा मशिदीत 'मन की बात' ऐकण्यासाठी आलेल्या मुस्लिम महिलेने IANS वृत्तसंस्थेला आपली प्रतिक्रिया देताना 'पंतप्रधान मोदी हे भावासारखे आहेत', असं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी मुस्लिमांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यामुळे आम्ही भाजप पक्षासोबत आहोत. यापूर्वी कोणीही महिलांसाठी एवढं योगदान दिलं नाही. त्यामुळे आम्ही मोदींसोबत असून ते एका भावाचं कर्तव्य पार पाडत आहेत, असंही या महिलेने म्हटलं आहे. (वाचा - PM Modi Prays at Krishna’s Dwarka: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वारकेत केले स्नान; म्हणाले, 'द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता' (See Pics))

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)