Noida Shocker: नोएडातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील सरिता नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलींसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत सरिता आणि तिची तीन वर्षांची मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघींनाही जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी महिला आणि एका मुलीस मृत घोषित केले. तसेच दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत. महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले आहे, असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (नोएडा) मनीष मिश्रा यांनी सांगितले.
मृत महिलेच्या पतीचं नाव मनोज असून तो रुग्णालयात काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय सरिता तीन वर्षांपासून बरौला गावात भाड्याच्या घरात राहत होती. तिचा नवरा मनोज प्रयाग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मनोज घरी जेवण करून हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आला. 10-20 मिनिटांनी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला फोन करून घटनेची माहिती दिली. (हेही वाचा - Bank Employee Committed Suicide: वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या)
तथापी, या घटनेत सरिता आणि तिची 5 वर्षांची मुलगी कृतिका यांचा मृत्यू झाला, तर 3 वर्षांच्या दिव्यावर उपचार सुरू आहेत. मनोजला आणखी एक 7 वर्षांची मुलगी आहे, जी घटनेच्या वेळी शाळेत होती. या जोडप्याला चार मुली होत्या. त्यापैकी एक मुलगी त्यांनी सरिताच्या मोठ्या बहिणीला दिली. (हेही वाचा -Nagpur Suicide Case: नागपूर मध्ये IAS, IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने 25 वर्षीय मुलाची आत्महत्या)
प्राप्त माहितीनुसार, मनोज कामावर निघून गेल्यानंतर सरिताने प्रथम तिची तीन वर्षांची मुलगी दिव्या हिला चौथ्या मजल्यावरून आणि नंतर पाच वर्षांची मुलगी कृतिका हिला फेकून दिले. यानंतर तिने स्वतः इमारतीवरून उडी मारली. आर्थिक विवंचनेतून महिलेने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.