Noida Police Seized Drugs: अमिटी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडे सापडले ड्रग्ज, नोएडा पोलिसांनी केला पर्दाफाश; पाच जण अटकेत
Drugs PC Twitter

Noida Police Seized Drugs: अमिटी युनिव्हर्सिटीतील विद्यार्थांकडे देशी- विदेशी ड्रग्ज सापडल्याची धक्कादायाक माहिती समोर आली आहे. शनिवारी सेक्टर 126 नोएडा पोलिस स्टेशनने नोएडा - दिल्ली येथील एमिटी युनिव्हर्सिटी आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एमिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात देशी- विदेशी ड्रग्ज सापडले आहे. (हेही वाचा- मुंबई मध्ये 1.57 कोटीचे 5 किलो Hashish Drugs जप्त; Kandivali unit of Mumbai Anti Narcotics Cell ची मोठी कारवाई)

मिळालेल्या माहितीनुसार, या पूर्वी ही नोव्हेंबरमध्येही पोलिसांनी ड्रग्ज टोळाची पर्दाफाश केला. पोलिसांनी त्यावेळी 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आणि अमिटी विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांसह नऊ जणांना अंमली पदार्थ पुरवल्याप्रकरणी अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर मिळालेल्या पूराव्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानंतर नोएडा पोलिस उपायुक्त हरिश चंदर यांनी एक पथक नेमलं. अतिरिक्त पोलिस उपायुक्त मनीष मिश्रा आणि एसीपी रजनीश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर 126 पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून होते.

त्यानंतर पीजीत राहणारे विद्यार्थी आमली पदार्थांच्या जाळ्यात अडकल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पाच जणांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी  10 ते 12 लाख (आंतरराष्ट्रीय किंमतीचे) ड्रग्ज जप्त केले. ड्रग्जमध्ये अनेक विदेशी ड्रग्ज सापडले. सोबत 7 मोबाईल आणि स्कुटी जप्त केली आहे.