Lockdown In India: लॉकडाऊन काळातील देवदूत; घरामालकाने 50 भाडेकरुंचे घरभाडे केले माफ
Kushal Pal (PC - ANI)

Lockdown In India: नोएडातील (Noida) एक घरमालक लॉकडाऊन काळात मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. या घरमालकाने 50 भाडेकरुंचे घरभाडे माफ केले आहे. तसेच प्रत्येक भाडेकरुंना 5 किलो पीठ वाटले आहे. कौशल पाल (Kushal Pal) असं या घरमालकाचं नाव आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. याचा सर्वात जास्त फटका मजूरांना बसत आहे. हाताला काम नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थिती घर भाडे कसे द्यायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न या कामगारांना पडला आहे. त्यामुळे अनेक कामगार आपल्या गावाकडे पायी निघाले आहेत. (हेही वाचा - तामिळनाडूमध्ये 17 नवीन कोरोना बाधित रुग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 67 वर पोहचली; 30 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

या मजुरांच्या मदतीसाठी नोएडा येथील सेक्टर 49 मध्ये राहणारे कौशल पाल यांनी 50 भाडेकरुंचे घरभाडे माफ केले आहे. तसेच लॉकडाऊन काळात याच ठिकाणी राहण्याचा सल्लाही दिला आहे. याशिवाय पाल यांनी आपल्या सर्व भाडेकरूंना पाच किलो पीठ वाटले आहे. यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाल यांना 50 भाडेकरूंकडून 1.50 लाख रुपये मिळतात. परंतु, देशातील एकूण परिस्थीती पाहता पाल यांनी कामगारांकडून भाडे घेण्यास नकार दिला आहे.