NIA ATTACK PC TWITTER

West Bengal Blast Probe: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एनआयएच्या (NIA) पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्यासाठी आलेल्या एनआयए टीवर हल्ला केला. या हल्ल्यात काही अधिकारी जखमी झाले आहे. ही घटना ६ एप्रिलच्या सकाळी घडली. (हेही वाचा-प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून अमेठी येथून लोकसभा लढण्याचे संकेत;

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणासाठी एनआयए गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी टीमवर हल्ला केला. भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणात एकाला अटक करण्यासाठी एनआयएची टीम गावात आली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी रस्त्यावर अधिकाऱ्यांची गाडी रोखली.  त्यांच्यावर दगडफेक करून गाड्याची काच फोडली. या भीषण हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

दोन वर्षापूर्वी तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट झाला होता.तर या प्रकरणी एएनआय चौकशीसाठी पश्चिम बंगाल येथील संदेशखळी येथे आले होते. त्यावेळी त्यांना दगडफेक आणि आंदोलकांना सामोरे जावे लागले. हल्लेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्त संस्थेने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.