Zydus Cadila | Photo Credits: Twitter/ ZydusUniverse

भारतामध्ये पुन्हा कोरोना संक्रमणाचा कहर सुरू झाला आहे. दुसर्‍या लाटेमध्ये झपाट्याने पसरत असलेला हा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लसीकरण वेगवान करण्याकडे प्रयत्न केले जात आहेत तर आता त्याच्या बरोबरीने Zydus Cadila ने Pegylated Interferon Alpha 2b, PegiHepTM या औषधाला मान्यता मिळावी म्हणून DCGI कडे अर्ज दाखल केला आहे. या औषधाच्या रूग्णांवर हजारो ट्रायल्स झाल्यानंतर आता झायडस कॅडिलाने DCGI कडे या औषधाला मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, PegIFN हे औषध दिल्यानंतर 91.15% रूग्णांचे RT PCR टेस्ट रिपोर्ट्स 7 दिवसांत निगेटीव्ह आले आहेत. तर सध्याच्या standard of care आर्म्स मध्ये हेच प्रमाण 78.90% आहे. Zydus Cadila च्या माहितीनुसार हे औषध आजारपणात लवकर देणं आवश्यक आहे.

दरम्यान कंपनीच्या दाव्यामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की त्यांचे फेज 3 ट्रायल्स हे उत्तम आहेत. कोविड 19 डिसिज मॅनेजमेंट मध्ये PegIFN लवकर दिल्यास रूग्ण लवकर बरा होऊ शकतो तसेच आजारातील गुंतागुंत देखील टाळता येत आहे. Zydus Cadila ने कोविड 19 विरूद्धच्या लढाईत त्यांच्या अ‍ॅण्टी वायरल ड्रग्स Remdesivir च्या किंमतीत केली मोठी घट आता 100 mg vial साठी मोजावे लागणार 899 रूपये.

PegIFN हे अ‍ॅन्टी वायरल एजंट असण्यासोबतच त्याचे इतर फायदे देखील असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे औषध single-dose regimen असल्याने म्हणजे एकदाच देऊन परिणाम साधता येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. रूग्णांसाठी ते आर्थिक दृष्ट्या देखील परवडणारे आहे.

PegIFN हे भारतामध्ये यापूर्वी Hepatitis C आजारासाठी मान्यताप्राप्त आहे. 2011 साली ते भारतीय बाजारात उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आता हे कोविड 19 साठी देखील वापरता येऊ शकतं.

सध्या Zydus Cadila मेक्सिको मध्ये फेज 2 ट्रायल्स घेत आहे. तर अमेरिकेमध्ये देखील या औषधांच्या ट्रायल्स सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचं मीडिया रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.