Zomato IPO 14 जुलै रोजी होणार सुरु; इतकी असू शकते शेअरची किंमत
Zomato (Photo Credits: IANS)

झोमॅटो (Zomato) लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आपीओ) (Initial Public Offering, IPO) 14 जुलै रोजी सुरु होणार असून 16 जुलैला बंद होणार आहे. या आपीओमध्ये इक्विटी शेअरची किंमत 72-76 रुपये प्रति शेअर असण्याची शक्यता कंपनीने एका निवेदनाद्वारे वर्तवली आहे. कमीत कमी 195 इक्विटी शेअरसाठी तुम्ही बोली लागू शकत आणि त्यापुढे सुद्धा 195 इक्विटी शेअरच्या स्लॉटवर बुकींग करु शकता. (Zomato Drone ची चाचणी यशस्वी, 10 मिनिटांत पोहोचवले 5 किलो वजनाचे खाद्यपदार्थ)

या आपीओमध्ये सुमारे 9000 कोटींपर्यंतचा फ्रेश इश्यू दिला असून त्यापैकी 375 कोटी इन्फो एज लिमिटेडकडून विक्रीसाठी देण्यात आला आहे. या ऑफरअंतर्गत सुमारे 65 लाख इक्विटी शेअर्सवर रिर्झर्व्हेशन असणार आहे. हे रिर्जव्ह केलेले इक्वीटी शेअर्स कंपनीचे कर्मचारी विकत घेऊ शकतात.

क्वालिफाईड इस्टिट्युशनल बायर्सच्या (QIB) हिस्स्यापैकी 60 टक्के शेअर्स कंपनीतील सेलिंग शेअर होल्टर्स आणि मॅनेजर्सकडे असतील. SEBI च्या नियमांनुसार, यातील 1/3 हिस्सा डॉमेस्टिक म्युच्युअल फंड्सकरता अॅलॉट केला जाईल. यासोबतच  QIB चा 5 टक्के हिस्सा म्युच्युअल फंडसाठी दिला जाईल.

म्युच्युअल फंड्समधून यासाठी QIB पोर्शनच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी मागणी असेल तर बॅलन्स इव्हीटी शेअर्स हे म्युच्युअल फंडसाठी वापरले जातील. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टनली इंडिया कंपनी लिमिटेड, क्रेडिट सियुज सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या तीन मोठ्या ग्लोबल कॉर्डिनेटर्स आहेत. यासोबतच या ऑफरसाठी बोफा सिक्युरिटी इंडिया लिमिटेड आणि सिटी ग्रुप ग्लोबल्स मार्केट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुद्धा भाग घेतील.