Zomato Drone ची चाचणी यशस्वी, 10 मिनिटांत पोहोचवले 5 किलो वजनाचे खाद्यपदार्थ
झोमॅटो ड्रोन डिलिव्हरी (Photo Credit: Twitter/Pixabay)

ऑनलाईन ऑर्डरिंग आणि फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने बुधवारी आपली हायब्रिड ड्रोन सेवेची (Drone Service) पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीमध्ये केवळ 10 मिनिटांमध्ये पाच किलोमीटर चेअंतर कापून फूड पॅकेटची डिलिव्हरी करण्यात आली. यात 80 किमी प्रति तासाच्या हिशोबाने ही डिलिव्हरी झाल्याचे सांगण्यात येतय. झोमॅटोच्या या यशस्वी चाचणीनंतर लवकरात लवकर ही ड्रोन सेवा सुरु होईल असे झोमॅटोच्या अधिका-यांकडून सांगण्यात येतय.

झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिन्दर गोयल (Deepinder Goyal) यांनी सांगितले की, ''ह्या हायब्रिड ड्रोन ने 5 किमी चे अंतर केवळ 10 मिनिटांत पुर्ण केले गेले. याची गती 80 किमी प्रति तास इतकी होती. या चाचणीत 5 किलो वजनाचे ऑर्डरची डिलिव्हरी करण्यात आली. येत्या काही दिवसांता दिल्ली आणि मोठ्या उपनगरांमध्ये कंपनी ही सेवा सुरु करेल. या सेवेमुळे वेळेची बचत होऊन कमी वेळात फूड डिलिव्हरी होईल." असेही त्यांनी सांगितले. आपला हा आनंद त्यांनी ट्विटरवर शेअर केला.

Zomato ने 2018 मध्ये लखनऊ बेस्ड स्टार्टअप TechEagle इनोवेशन संपादित केले होते. हे ड्रोन टेक्नोलॉजीवर कामर करणारी स्टार्टअप असेल. त्यानंतर भारतात ड्रोन बेस्ड फूड डिलिव्हरी करण्याची शक्यता वाढली होती.

Zomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी

कंपनी हायब्रिड मल्टी-रोटोर ड्रोन्स चे सुद्धा एक हब टू हब डिलिव्हरी नेटवर्क बनवत आहे. यामुळे आता लवकरच ग्राहकांच्या घराघरांमध्ये जाऊन डिलिव्हरी करेल हे सांगण्यात येतय.