Lok Sabha Elections 2019:  महेंद्र सिंग धोनी याची लेक 'झिवा'ने सुपरक्युट अंदाजात केलं मतदानाचं आवाहन
MS Dhoni (Photo Credits: Instagram@mahi7781)

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आज पत्नी साक्षीसोबत लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी मतदान केलं आहे. या मतदानासाठी एम एस धोनी आणि साक्षीची लेक झिवाने (Ziva) भारतीय मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. इंस्टाग्रामवर झिवाचा सुपरक्युट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'बाहेर पडा आणि मत द्या', असे म्हणत सचिन तेंडूलकर याचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन (watch Video)

झिवाचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Use your Power

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

आज जवाहर विद्यामंदिर (Jawahar Vidya Mandir) मध्ये आज दुपारी झारखंडमध्ये मतदान केलं. सध्या धोनी आयपीएलमध्ये चैन्नई सुपरकिंग संघातून खेळत आहे. त्यानंतर तो वर्ल्डकपसाठी लंडनला रवाना होणार आहे.

आज पाचव्या टप्प्यातील मतदान सात जिल्ह्यात आणि 51 जागांवर होणार आहे. तर मतमोजणी 23 मे दिवशी होणार आहे.