Rashmika Mandanna Deepfake Video (PC - Twitter)

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna)  मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या मुलीच्या वर रश्मिकाचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे त्या झारा पटेल कडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. झारा पटेल (Zara Patel) ही ब्रिटीश इंडियन सोशल मीडीया पर्सनॅलिटी आहे. आता झाराने इंस्टाग्राम वर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. यामध्ये यामध्ये तिने सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये आपला काहीच हात नसल्याचं म्हटलं आहे. जे होत आहे त्याच्यामुळे अपसेट असल्याचं तिने म्हटलं आहे.

मूळ व्हिडिओ मध्ये झारा पटेल काळ्या वर्क आऊटच्या वन पिस मध्ये आहे. AI चा वापर करत झारा च्या शरीरावर रश्मिकाच्या चेहर्‍याचा वापर करत व्हिडिओ बनवण्यात आला होता. नक्की वाचा: Rashmika Mandanna ने तिच्या वायरल होत असलेल्या मॉर्फ व्हिडिओ वर दिली पहिली प्रतिक्रिया! (View Tweet).

पहा झारा पटेलची प्रतिक्रिया

Zara Patel Post | Instagram

रश्मिकाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणामध्ये अ‍ॅपला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान रश्मिकाच्या पाठीशी Amitabh Bachchan, Mrunal Thakur, Naga Chaitanya, Chinmayi Sripaada यांनी उभं राहत आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी एआय च्या गैरवापराचा मुद्दा समोर आला आहे.