Youth Holding Gun Viral Video | (Photo Credit - Twitter)

रामनवमीच्या मिरवणुकीत (Ram Navami Procession) शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बंदुकीसह दिसणाऱ्या सुमित शॉ नामक युवकाला पोलिसांनी आज बिहारमधील मुंगेर येथून अटक करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉ याने रामनवमीच्या रॅलीमध्ये बंदुक बाळगल्याची कबुली दिली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धार्मिक मिरवणूक दिसत आहे ज्यामध्ये एक तरुण बंदुक हातात धरताना दिसत आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. लेटेस्टली मराठीने या व्हिडिओची पडताळणी करु शकला नाही.

दुसऱ्या बाजूला खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला भारतीय जनता पक्षाने उत्तर देत दावा केला आहे की, हा व्हिडिओ बंगालमधील हावडा येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या रामनवमी रॅलीचा नाही. (हेही वाचा, Sanjay Raut on Riots: बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, संजय राऊतांचा गंभीर आरोप)

ट्विट

रामनवमीच्या रॅलींमध्ये हुगळी आणि हावडा येथे जातीय संघर्ष झाला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी हावडा येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर अनेक वाहने जाळण्यात आली होती. हिंसाचारात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली तर काही पोलिसांच्या वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या प्रकाराची देशभरात चर्चा सुरु आहे.

ट्विट

या हिंसक चकमकींमुळे सत्ताधारी तृणमूल आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. बंगाल सरकारने हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केली आहे आणि प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.