Android Smartphone (Photo Credit- flickr William Hook)

गुगलने (Google) नुकताच लेटेस्ट अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम Android 11 लॉन्च केले आहे. त्याचसोबत स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांकडून अॅन्ड्रॉइड 11 चे अपडेट सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. अॅन्ड्रॉइड 11 संबंधित खुप चर्चा सुरु आहे. मात्र अॅन्ड्रॉइड 11 मुळे स्मार्टफोनमध्ये काय बदल होणार हे अत्यंत कमी लोकांना माहिती असेल. म्हणूनच आम्ही तुम्हाला या नव्या अपडेट्सनुसार स्मार्टफोन मध्ये काय बदल होणार याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.(WhatsApp Crash Codes: व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सला येतेय एक विचित्र समस्या, मेसेज मिळाल्यानंतर क्रॅश होतोय App)

गुगलचे ऑपरेटिंग सिस्टम फार पॉप्युलर आहे. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये याचा वापर केला जातो. गुगलकडून युजर्सला उत्तम अनुभव देण्यासाठी वेळोवेळी अपडेट्स जाहीर केले जाते. हे अॅन्ड्रॉइडच्या एका सीरिजच्या आधारावर जारी केले जातात. जे अॅन्ड्रॉइड10, अॅन्ड्रॉइड11 अशा नावाने ओळखले जाते. गुगलच्या नव्या ऑपरेटिंग 11 सिस्टिमचे अपडेट अपकमिंग स्मार्टफोनसह लेटेस्ट स्मार्टफोन मध्ये ही दिले जाणार आहे. तर 2GB पेक्षा कमी रॅम असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉइड11 अपडेट सपोर्ट करणार नाही आहे. यासाठी गुगलकडून वेगळे अॅन्ड्रॉइड Go सपोर्ट दिले आहे.

-अॅन्ड्रॉइड 11 च्या अपडेटनुसार, मोबाईलच्या पॉवर मेन्यू मध्ये अधिक बदल दिसून येणार आहे. म्हणजेच होम स्क्रिनमध्ये स्मार्ट होम कंट्रोल, पेमेंट एक्सेस, कूपनपास आणि बोर्डिंग पासचे ऑप्शन मिळणार आहे. म्हणजेच पॉवर बटणाचा वापर फक्त फोन अनलॉक करण्यापर्यंत मर्यादित राहणार नाही आहे. पॉवर बटण मेन्यू ते कनेक्टेडस्मार्ट होम डिवाइसला ऑपरेट केले जाऊ शकते.

-Google च्या नव्या अॅन्ड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमध्ये युजर्सला नोटिफिकेशन बबल्स मध्ये मिळणार आहेत. हे एकदम Facebook Messenger सारखेच असणार आहे. या फिचरमुळे मल्टी टास्किंग करणे अत्यंत सोपे होणार आहे. तसेच ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नोटिफिकेशन विविध डिवाइस केले जाऊ शकणार आहे. त्याचसोबत तुमचे महत्वाचे मेसेज सुद्धा Miss Out होणार नाही.

-नव्या अॅन्ड्रॉइड 11 आल्यानंतर युजर्स नोटिफिकेशन सेटिंगमध्ये बदल करता येणार आहे. म्हणजेच नोटिफिकेशनमध्ये डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करता येणार आहे. त्याचसोबत नोटिफिकेशनच्या सब मेन्यूमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री सुद्धा मिळणार आहे. Android11 मध्ये मीडिया कंट्रोलसाठी एक वेगळे क्विक टाइल दिले जाणार आहे. तसचे नोटिफिकेशन हिस्ट्री 24 तासांमधील महत्वाचे मेसेज ही पाहता येणार आहे.

-तसेच नवा स्क्रिनशॉट युआयई दिले असून जे iOS च्या प्रमाणे आहे. स्क्रिनशॉट काढल्यानंतर युजर्सला डाव्या बाजूला आणि खालील बाजूस एडिट सारखे ऑप्शन दिले जाणार आहे. त्याचसोबत नेटिव्ह स्क्रिन रेकॉर्डिंग सारखे फिचर सुद्धा दिले जाणार आहेत. त्याचसोबत इन-बिल्ट वॉइस रेकॉर्डिंगचे ऑप्शन दिले जाणार आहे.

-गुगलकडून नव्या अॅन्ड्रॉइ़ड मध्ये शेअरिंग ऑप्शन सेट करता येणार आहे. म्हणजेच शेअरिंग ऑप्शनचा अधिक वापर करता येणार आहे. ते तुम्हाला अप्पर साइडच्या येथे सेट करता येणार आहे.

-नव्या Airplane मोडमध्ये Wifi आणि ब्लूटूथ मोड बंद होणार नाही आहे. यामुळे युजर्सला अधिक सुविधा मिळणार आहे.(खुशखबर! Realme C12 चा उद्या रात्री 8 वाजता फ्लिपकार्टवर होणार सेल, कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी लाईफ असणा-या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये)

-स्मार्टफोनच्या सिक्युरिटीसाठी एक महत्वाचे फिचर दिले जाणार आहे. त्यानुसार लोकेशनचे एक्सेस करण्यासाठी युजरला परमिशन दिली जाते. म्हणजेच Android 11 मध्ये परमिशननंतर सर्वकाही ऑटो रिसेट होणार आहे.

तसेच अॅन्ड्रॉइडमध्ये डार्क मोड अलार्म पद्धतीने सेट करता येणार आहे. म्हणजेच डार्क मोड संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत सेट करता येणार आहे. ऐवढेच नाही तर Group Conversation सुद्धा करता येणार आहे. म्हणजेच विविध मेसेजसाठी विविध ग्रुप मेसेज तयार करता येणार आहे. मेसेज सायलेंट,डिफॉल्ट आणि म्यूट प्रायव्हेटाइज करता येणार आहे.