उत्तर प्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Elections 2022) तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी संकट काळात उत्तर प्रदेश सरकारने राबविलेल्या उपाययोजनांबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी (11 जुलै 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांची स्वतंत्र भेट घेतली. ही बैठक सुमारे 70 मनिटे चालली. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, आज आदरणीय पंतप्रदान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी नवी दिल्ली येथे शिष्टाचार भेट घेऊन मार्गदर्शन घेण्याचा योग आला. अत्यंत व्यग्र असतानाही वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. ही बैठक साधारण 1.5 तासांहून अधिक काळ चालली. राजकीय वर्तुळातून प्राप्त माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून योगी आदित्यनाथ यांच्याबाबतचा असंतोष वाढतो आहे. तसेच, कोरोना व्हायरस महामारीत यूपी सरकारने उचललेल्या पावलांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. योगिंनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ही मुलाखतही जवळपास दिड तासांहून अधिक काळ चालली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीस एक वर्षांपेक्षाहूनही अधिक कमी काळ बाकी राहिला आहे. त्यामुळे भाजपचे पूर्ण लक्ष्य हे पक्षातील मतभेद दूर करण्यावर केंद्रीत झाले आहे.
योगी आदित्यनाथ ट्वट
आज आदरणीय केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah जी से नई दिल्ली में शिष्टाचार भेंट कर उनका मार्गदर्शन प्राप्त किया।
भेंट हेतु अपना बहुमूल्य समय प्रदान करने के लिए आदरणीय गृह मंत्री जी का हार्दिक आभार। pic.twitter.com/1q1qYnrYq7
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 10, 2021
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमंनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना हटविण्याचे कोणताही विचार सध्या तरी भाजप नेतृत्वाच्या विचाराधीन नाही. परंतू, पक्षात इतर अनेक महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात. पक्षाचे वरिष्ठ नेते बी के संतोष यांच्या नेतृत्वातील एका समितीने गेल्या एक आठवड्यापासून उत्तर प्रदेश सरकारबाबत फिडबॅक जाणून घेतला. त्यानंतर आज हीबैठक पार पडली. या समितीने मत्री, आमदार आणि खासदारांसोबतही चर्चा केली. भाजपचे वैचारिक मार्गदर्श आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या असंतोषाबाबत पक्षाने फिडबॅक घ्यावा असे सूचवले होते. (हेही वाचा, Uttar Pradesh Assembly Election 2022: भीम आर्मी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची चिंता वाढवणार? भाजप विरोधात समाजवादी पक्ष, RLD सोबत आघाडीचे संकेत)
योगी आदितन्याथ ट्विट
आज आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी से नई दिल्ली में शिष्टाचार भेंट एवं मार्गदर्शन प्राप्ति का सौभाग्य प्राप्त हुआ।
अपनी व्यस्ततम दिनचर्या से भेंट के लिए समय प्रदान करने व आत्मीय मार्गदर्शन करने हेतु आदरणीय प्रधानमंत्री जी का हृदयतल से आभार। pic.twitter.com/0pAmYVA44q
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 11, 2021
आरोप केला जात आहे की, योगी आदित्यनाथ हे सर्वांना सोबत घेऊन काम करत नाहीत. तसेच, ठाकुरेत्तर सामाजात प्रामुख्याने ब्राह्मण समाजात योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मोठी नाराजी आहे. भगवे वस्त्र परिधान करणारे योगी हे आमदार, आणि खासदार यांच्या संपर्कापासून कोसो दूर राहतात, असाही आरोप केला जात आहे.