Yogi Adityanath, Akhilesh Yadav Met Each Other: योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव आले समोरासमोर; घडले असे काही, पाहा व्हिडिओ
Yogi Adityanath, Akhilesh Yadav | (Photo Credits: ANI/Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election 2022) मध्ये जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा शपथविधी आज (सोमवार, 28 मार्च) पार पडत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये (UP Legislative Assembly) आज सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही बाजूचे आमदार सभागृहात उपस्थित होते. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Yogi Adityanath) समोरासमोर आले. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर कट्टर विरोधक म्हणून उभे ठाकलेले हे दोन्ही नेते जेव्हा परस्परांसमोर आले तेव्हा दोघांनीही एकमेकांचा आदर केला. एकमेकांशी हस्तांदोलन करत परस्परांना शुभेच्छा दिल्या. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Videos) झाला आहे.

दोन्ही नेत्यांनी सभागृहात हास्यवदनाने एमेकांचे स्वागत केले. योगी आदित्यनाथ यांनीही अखिलेश यांच्या खांद्यावर हात ठेवला. घडले असे की, योगी आदित्यनाथ यांनी आगोदर शपथ घेतली आणि उपस्थितांना नमस्कार करत ते पुढे निघाले. या वेळी जसे ते अखिलेश यादव यांच्यासमोर आले तेव्हा अखिलेश यांनी खुर्चीवरुन उभे राहात त्यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेते या वेळी प्रसन्न भावमु्द्रेत पाहायला मिळाले. (हेही वाचा, Yogi Adityanath Oath Ceremony: योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; उपस्थितीसाठी अखिलेश यादव, मायावती यांनाही फोन)

ट्विट

सदनाच्या परंपरेला अनुसरुन पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर विरधी पक्षनेता म्हणून अखिलेश यादव यांनी दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. अखिलेश यादव आपल्या आसनावरुन उठून निघाले असताना त्यांच्यासमोर योगी आदित्यानाथ आले. या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर योगी आणि अखिलेश आपापल्या आसनाकडे निघून गेले. 18 व्या विधानभेसाठी निवडून आलेल्या आमदारांना राज्यपालांद्वारे नवनियुक्त प्रोटेम स्पीकर रामपती शास्त्री यांनी शपथ दिली. आगोदर योगींनी शपथ घेतली त्यानंतर अखिलेश यांनी. त्यानंतर एकेका आमदाराने शपथ घेतली.